इमरान-सोनाक्षी पुन्हा झळकणार एकत्रित

‘वंस अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ या सिनेमात इमरान खान-सोनाक्षी सिन्हा यांची जोडी पहिल्यां दाच झळकत आहे. या सिनेमातील इमरान-सोनाक्षी यांची केमेस्ट्री फिल्म निर्माता एकता कपूरला खूपच आवडली आहे. त्यालमुळे एकता कपूरने आगामी काळात येत असलेल्या सिनेमासाठी पुन्हास एकदाही जोडी फायनल केली आहे.

निर्माता एकता कपूरच्या मते, इमरान-सोनाक्षी यांची जोडी एक लाजवाब युगल म्हणून पुढे येत आहे. त्यांनी ‘वंस अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ या सिनेमात चांगले काम केले आहे. या जोडीची केमेस्ट्री या सिनेमात खूप चांगल्या’ पध्दातीने जमली आहे. त्या मुळेच या हिट जोडीला एकत्रित घेवून सिनेमाची निमिर्ती करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी सध्या नवीन सिक्रप्टज लिहण्याचे काम सुरु आहे.

याबाबत बोलताना अभिनेता इमरान खान म्हणाला ‘मला अजून तरी एकता कपूर यांनी केलेल्या‍ योजनेविषयी पूर्ण माहिती नाही. मात्र या सिनेमात मी आणि सोनाक्षीने केलेल्या कामावर एकता मात्र खूपच खूष आहे. त्यामुळे तिच्या आगामी काळात येत असलेल्या सिनेमात काम करण्याची संधी मिळेल असे वाटते. ‘वंस अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ हा सिनेमा १५ आगस्ट रोजी रिलीज होणार आहे.

Leave a Comment