सायना, सिंधू प्री क्वार्टर फायनलमध्ये

ग्वांगझू – जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालने व पी.व्ही. सिंधूने दोन्ही खेळाडूंनी प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दोन्ही खेळाडूना पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाल्यानंतर या दोन्ही खेळाडूंनी प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पहिल्या सामन्यात दोघांनीपण नेत्रदीपक कामगिरी करताना सर्व प्रेक्षकांच्या डोळयाचे पारणे फेडले. आता सायनाची गाठ १५ वी मानांकित थायलंडच्या पोर्नटीप बुरानाप्रासर्तसुक हिच्याशी होईल.

पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाल्यानंतर चमकदार कामगीरी करत सायना नेहवालने व पी.व्ही. सिंधूने या दोन्ही खेळाडूंनी प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे अजय जयराम आणि तरुण कोना, अरुण विष्णू यांचा पराभव झाला. यानंतर चेक गणराज्यच्या पेत्र कोकलने सामन्यातून माघार घेतल्याने पारुपल्ली कश्यपला विजयी घोषित करण्यात आले.

तिसरी मानांकित सायनाने महिला एकेरीतील दुस-या फेरीत रशियाच्या ओल्गा गोलोवानोवाला दोन सरळ सेटमध्ये पराभूत केले. तिने सामन्यात आठ स्मॅश विनर, चार नेट विनर आणि दहा क्लिअर विनर मारले. जागतिक क्रमवारीत ६६ व्या क्रमांकावर असलेल्या गोलोवानोवाला संपूर्ण सामन्यात फक्त ९ गुण मिळवता आले. आता सायनाचा सामना १५ वी मानांकित थायलंडच्या पोर्नटीप बुरानाप्रासर्तसुक हिच्याशी होईल. तिच्याविरुद्ध सायनाचा ५-० असा विजयी रेकॉर्ड आहे. त्यामुळे हा सामना सायना आरामात जिंकेल असे वाटते.

Leave a Comment