शहीद कुंडलिंक माने अंनतात विलीन

कोल्हापूर: पिंपळगाव पंचक्रोशीतील हजारो नागरिकांच्या जनसागराच्या उपस्थितीत शहीद कुंडलिक माने यांच्यावर लष्कराच्या इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले. पिंपळगावात कुंडलिंक माने यांना अंत्यसंस्कार करण्याआधी मानवंदना देण्यात आली. कुंडलिक माने यांच्या अंत्यसंस्काराला गृहमंत्री आर.आर.पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, हर्षवर्धन पाटील, तसेच भाजप नेते गोपीनाथ मुंडेही हजर होते.

कोल्हापूर जिल्हा तसेच पिंपळगाव पंचक्रोशीतून हजारो नागरिकांचा जनसागर अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी उसळला होता. कुंडलिक माने हे अत्यंत गरीब शेतकरी परिवारातून होते. त्यांच्या जाण्याने त्यांचे वडिल केरबा माने यांना धक्का बसला आहे.

माने शहीद झाल्याचे वृत्त येताच गेल्या दोन दिवसांपासून पिंपळगावावर शोककळा पसरली होती. गुरुवारी सकाळी माने यांचे पार्थिवशरीर पिंपळगाव येथील घरी आणण्यात आले. यानंतर गावाशेजारील विस्तीर्ण भूखंडावर माने यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. घऱच्या एकूलत्या एक कमावत्या मुलाच्या मृत्यूमुळे माने कुटुंबियांना अश्रू आवरेनासे झाले होते.