वेलदोडयांचे दर उतरले

तिरूवनंतपुरम – यंदा दक्षिण भारतात समाधानकारक पाऊस झाल्याने वेलदोड्यांचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. मागील वर्षाचा माल शिल्लक असल्याने सध्या बाजारात वेलदोडयाचे भाव कमी होत असल्याचे समजते. गेल्या वीस दिवसांत हे भाव किलोला ९६० वरून ७४० रूपयांवर आले आहेत. यंदा उत्पादनात ६ ते १० टक्के वाढ होईल असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

अर्थात रूपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत होत असल्याने वेलदोड्यांच्या निर्यातीला चालना मिळाली असून निर्यातीमुळे मागणी वाढली असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे. तमीळनाडूनील वेलदोड्याचे व्यापारी पी. बेलमुरूगन म्हणाले की जुना माल व्यापार्‍यांनी बाजारात आणला आहे आणि नवीन आवकही सुरू होत असल्याने बाजाराम माल मुबलक प्रमाणात आहे. मात्र स्थानिक बाजारात मागणी कमी आहे. त्यामुळे भाव उतरत आहेत.

स्पायसेस बोर्डाच्या म्हणण्यानुसार आत्ता भाव उतरले असले तरी उत्तम दर्जाच्या वेलदोड्याचे भाव टिकून आहेत. निर्यात चांगली होत असल्याने मालाचा खप आहे व त्यामुळे भाव कोसळण्याची शक्यता नाही.

Leave a Comment