अमेरिकेत हिंदी भाषिकांची संख्या साडेसहा लाखांवर

वॉशिग्टन – अमेरिकेत हिंदी बोलणार्‍याची संख्या साडेसहा लाखांवर गेली आहे तर अन्य भारतीय प्रादेाशिक भाषा बोलणार्‍याची संख्या ८ लाखांहून अधिक झाली असल्याचे जनगणनेतील अहवालावरून स्पष्ट झाले आहे. अमेरिकेत बोलल्या जाणार्‍या भाषांविषयी या जनगणनेत नोंदी घेतल्या गेल्या होत्या.

या अहवालानुसार हिंदी बोलणार्‍याची संख्या १०५ टक्कयांनी वाढली आहे. मात्र तरीही अमेरिकेत सर्वाधिक बोलल्या जाणार्यात दहा भाषांत हिंदीचा समावेश अद्याप झालेला नाही. गेल्या दशकात आशियाई भाषा बोलणाऱ्यांची संख्या वाढत गेल्याचे दिसून आले आहे. त्यात मल्याळम, तेलगू, तमीळ भाषिकांत ११५ टक्के वाढ नोंदविली गेली आहे. पंजाबी, बंगाली, मराठी भाषिकांत हीच वाढ ८६ टक्के आहे. तर गुजराथीत ५२ टक्के व उर्दूत ४२ टक्के वाढ झाली आहे.

अमेरिकेत इंग्रजी, स्पॅनिश या भाषांबरोबरच चीनी, व्हिएतनामी, फ्रेंच, जर्मन व कोरियाई भाषा बोलणाऱ्यांची संख्या दहा लाखांहून अधिक असल्याचेही या अहवालात ममूद करण्यात आले आहे.