नवी दिल्ली – राजकीय वादळ निर्माण करणार्या कोळसा खाणवाटप घोटाळ्याचा तपास सध्या केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करत आहे. या तपासात सीबीआयला पूर्ण सहकार्य करण्याचा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला.
सीबीआयला तपासात पूर्ण सहकार्य करण्याचा केंद्र सरकारला आदेश
सर्वोच्च न्यायालयच या तपासावर देखरेख ठेऊन आहे. कागदपत्रे पुरवण्याबाबत कोळसा मंत्रालय सीबीआयला सहकार्य करत नसल्याचा आरोप एका याचिकाकर्त्याकडून करण्यात आला. त्यावर न्यायालयाने वरील आदेश दिला. सीबीआयला आवश्यक ती सर्व माहिती आणि फाईली उपलब्ध केल्या जाव्यात, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
तसेच, तपासाच्या स्थितीबाबतचा अहवाल 29 ऑगस्टपर्यंत सादर करावा, असा आदेशही न्यायालयाने सीबीआयला दिला. दरम्यान, तपासात सहकार्य केले जात नसल्याचा याचिकाकर्त्याचा आरोप आजच्या
सुनावणीवेळी सीबीआयनेच फेटाळून लावला.