इस्लामाबाद – पाकिस्तानात काल रात्री बलुच बंडखोरांनी 13 अपहृत प्रवाशांची हत्या केली. ही घटना बलुचिस्तान प्रांतातील बोलान जिल्ह्यात घडली. सुरक्षारक्षकांच्या वेशात आलेल्या बंडखोरांनी क्वेट्टाहून पंजाब प्रांताकडे जाणार्या काही बसगाड्या अडवल्या. त्यातील 26 प्रवाशांना बंडखोरांनी ओलीस ठेवले.
बलुच बंडखोरांकडून पाकिस्तानात 14 जणांची हत्या
त्यानंतर नजीकच्या डोंगरावर 13 प्रवाशांना नेऊन बंडखोरांनी त्यांची हत्या केली. ओलीस ठेवलेल्या उर्वरित प्रवाशांना बंडखोरांनी सोडून दिले. दरम्यान, दुसर्या घटनेत बंडखोरांनी याच भागात निमलष्करी दल असणार्या फ्रंटियर कॉर्झच्या (एफसी) एका सैनिकाची हत्या केली.