भुवनेश्वर – ओडिशाच्या एका खेड्यामध्ये एका विवाहित महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार्या नराधमाला पीडित महिलेने मोठ्या धाडसाने स्वत:च शिक्षा केली आणि त्याचे वृषण धारदार शस्त्राने छाटून टाकले. या प्रकारामुळे ओडिशात मोठी खळबळ उडाली आहे आणि लोक त्या महिलेचे अभिनंदन करत आहेत.
बलात्कार करणार्याचे वृषण कापले
भुवनेश्वरपासून १०० कि.मी. अंतरावरच्या जगतसिंगपूर जिल्ह्यातल्या गोपाळपूर या गावी ही घटना घडली. दोन मुलांची आई असलेल्या या महिलेवर दोघा गुंडांचा डोळा होता. ती सायंकाळी मंदिरातून घरी परत जात असताना त्या दोघांनी तिला गाठले आणि तिच्याशी अतिप्रसंग करण्यास सुरुवात केली. पण या महिलेने मोठ्या धाडसाने त्यांच्या हातून आपली सुटका करून घेतली आणि ती धावत घरी आली.
एवढ्यावरही त्यातल्या एका गुंडाने तिचा घरापर्यंत पाठलाग केला आणि घरी येऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यावर तिने आपल्या घरातला धारदार चाकू हातात घेतला आणि त्या नराधमाचे वृषण कापून टाकले. त्याला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोन गुंडांव्यतिरिक्त तिसर्याच एका व्यक्तीने या संबंधात पोलिसात ङ्गिर्याद दिली असून पोलिसांनी ती नोंदवून घेतली आहे.