पाकिस्तानात तालिबानींकडून दोन लष्करी अधिकार्‍यांची हत्या

इस्लामाबाद -पाकिस्तानमध्ये आज तालिबानी दहशतवाद्यांनी दोन लष्करी अधिकारी आणि एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याची गोळ्या घालून हत्या केली. महिनाभरापूर्वी दहशतवाद्यांनी दहा परदेशी गिर्यारोहकांची हत्या केली होती. या हत्याप्रकरणाच्या तपासात तिन्ही अधिकारी सहभागी होते.

कर्नल गुलाम मुस्तफा, कॅप्टन अशफाक अझिझ आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक हिलाल अहमद अशी तालिबानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अधिकार्‍यांची नावे आहेत. तपासाचा आढावा घेऊन हे अधिकारी परतत होते. त्यावेळी गिलगिट-बाल्टिस्तान विभागात त्यांच्या वाहनाला दहशतवाद्यांनी
लक्ष्य केले.