सुरक्षिततेच्या क्षेत्रात नवा प्रकल्प – डेक्कन वॉटर ट्रिटमेंट

पुणे, : भारतातील गडचिरोली हा नक्षलग्रस्त भाग असो की युद्धाने उध्वस्त झालेला सोमालिया पुण्यातील डेक्कन वॉटर ट्रिटमेंट या उद्योगसमूहाने उर्जा सुरक्षिततेच्या क्षेत्रात या दोन्ही ठिकाणी अभूतपूर्व कामगिरी केली असून त्यांना परदेशातून ६ . २ कोटी डॉलर किमतीची सौर उर्जा प्रकल्पाची ऑर्डर मिळाली आहे.

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिर्बन सरकार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. रुपया घसरलेला असताना ही ऑर्डर मिळाल्याने १ ० ० कोटी रुपये किमतीचे महागडे परकीय चलन देशाला मिळणार आहे. ३ १ मेगावॉट क्षमतेचा हा प्रकल्प असून त्यासाठी फोटोव्होल्टेक पद्धतीचा वापर केला जाणार आहे अशी माहिती देऊन ते म्हणाले की नैरोबीतील पीडमोन्ट इन्व्हेस्टमेंटकडून ही ऑर्डर मिळाली आहे. हे तंत्र वापरणारे सध्या जगात १ ० ० देश आहेत आणि अशी ऑर्डर मिळालेला भारत हा त्यापैकी एक आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात आम्ही काम करत आहोत तसेच मध्य प्रदेश आणि गोवा या राज्यातही आमही विस्तार केला आहे.

पुण्याजवळ खराडी येथे कंपनीचा प्रकल्प असून १ ९ ९ ८ मध्ये केवळ १ ० कोटी रुपये भांडवल गुंतवून सुरु केलेल्या या कंपनीने ५ ० लाखावरून १ ० ० कोटी रुपये उलाढालीचा टप्पा गाठला आहे. सध्या आमच्याकडे ५ ०० कोटी रुपयांच्या ऑर्डर आहेत असे नमूद करून ते म्हणाले की सोमालियातील युद्धाने नष्ट झालेले मोगादिशु येथील सर्व पायाभूत सुविधा उभारणीसाठी आमची अध्यक्षांचे सल्लगार म्हणून निवड झालेली आहे. एक प्रकारे भारताचे प्रतिनिधित्व आम्ही करत आहोत. त्याच प्रमाणे ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलंड सरकारसाठी गेली तीन वर्षे आम्ही काम करत आहोत. आमच्या कंपनीत २ ० ० कर्मचारी काम करत आहेत .

परदेशातील अनुभव सांगताना सरकार म्हणाले की सौर उर्जा प्रकल्पासाठी आम्ही जी किंमत निविदेत दिली त्यापेक्षा एक डॉलर जास्त द्यावा लागत नाही इतकी प्रशासनात पारदर्शकता आहे. हे आपल्या सरकारने शिकण्यासारखे आहे. सोमालिया आणि गडचिरोली दोन्हीकडे प्रतिकूल स्थिती असतना आम्ही उत्तम काम केले आहे. सौर ऊर्जेबाबत सरकारी धोरण मात्र अपेक्षा पूर्ण करत नाही कारण मनुष्यबळ, तंत्रज्ञान आणि क्षमता या तीन्हीबाबत आपल्याला मोठा पल्ला गाठावा लागेल त्यासाठी आणखी प्रोत्साहन गरजेचे आहे.

डेक्कन वॉटर ट्रिटमेंटची मालकी सरकार या बंगाली उद्योजकाकडे असूनही तेथे ८ ० टक्के कर्मचारी मराठी आहेत आणि स्वतः अनिर्बन सरकार उत्तम मराठी बोलतात. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यात सेंट जोसेफमध्ये तर अभियांत्रिकी पदवी त्यांनी शासकीय महाविद्यालयातून मिळविली आहे.

Leave a Comment