राहुलने फोडले नव्या वादाला तोंड

अलाहाबाद: सध्या वाद म्हणजे काँग्रेस नेत्याच्या अंगवळणी पडलेला दिसत आहे. त्यमुळेच एकीकडे काँग्रेस नेत्यांकडून गरिबांची थट्टा झाल्यानंतर, आता खुद्द काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्याने वाद उभा केला आहे. राहुल गांधी यांच्या मते ‘गरिबी ही मानसिक स्थिती असून त्याचा जेवणासारख्या भौतिक गोष्टींशी संबंध नाही,’ असं म्हणून त्यांनी विरोधकाच्या हाती कोलीत दिले आहे.

नुकतच अलाहबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी हा दावा केला आहे. यावेळी बोलतांना राहुल म्हणले ‘लोक स्वत:मधला आत्मविश्वास जागवणार नाही तोपर्यंत ते गरिबीतून बाहेर पडणार नाहीत,’ असं यांनी म्हटलं आहे. सरकार गरिबांसाठी अनेक योजना राबवत आहे.

गरिबीला मुळापासून हटवण्यासाठी उपाय केले जात आहे. पण गरिबांना आत्मविश्वासाच्या जोरावर यातून बाहेर पडायला हवं. फक्त जेवण आणि पैसा दिल्याने लोक गरिबीतून बाहेर पडू शकणार नाही,’ असंही राहुल गांधींनी सांगितलं. त्यमुळेच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्याने वाद उभा केला आहे.