पुण्याच्या कंपनीला सौर ऊर्जेचे परदेशी कंत्राट

पुणे : पुण्यातील डेक्कन वॉटर ट्रिटमेंट या उद्योगसमूहाला परदेशातून ६.२ कोटी डॉलर किमतीची सौर उर्जा प्रकल्पाची ऑर्डर मिळाली आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिर्बन सरकार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रुपया घसरलेला असताना ही ऑर्डर मिळाल्याने १०० कोटी रुपये किमतीचे महागडे परकीय चलन देशाला मिळणार आहे असे श्री. सराकार यांनी सांगितले. ते या ऑर्डरनुसार द. आङ्ग्रिकेत ३१ मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहेत.

त्यासाठी ङ्गोटोव्होल्टेक पद्धतीचा वापर केला जाणार आहे. नैरोबीतील पीडमोन्ट इन्व्हेस्टमेंटकडून ही ऑर्डर मिळाली आहे. हे तंत्र वापरणारे सध्या जगात १०० देश आहेत आणि अशी ऑर्डर मिळालेला भारत हा त्यापैकी एक आहे. आपली कंपनी विदर्भात मोठ्या प्रमाणात काम करत आहे तसेच मध्य प्रदेश आणि गोवा या राज्यातही विस्तार केला जाणार आहे असे सरकार यांनी सांगितले. पुण्याजवळ खराडी येथे कंपनीचा प्रकल्प असून १९९८ मध्ये केवळ १० कोटी रुपये भांडवल गुंतवून तो सुरु केलेला आहे.

या कंपनीने ५० लाखावरून १०० कोटी रुपये उलाढालीचा टप्पा गाठला आहे. सध्या सोमालियातील युद्धाने नष्ट झालेल्या मोगादिशु येथील सर्व पायाभूत सुविधा उभारणीचे काम करण्यासाठी तिथल्या अध्यक्षांचे सल्लागार म्हणून या कंपनीची निवड झालेली आहे. त्याच प्रमाणे ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलंड सरकारसाठी गेली तीन वर्षे आम्ही काम करत आहोत. आमच्या कंपनीत २ ० ० कर्मचारी काम करत आहेत .

परदेशातील अनुभव सांगताना सरकार म्हणाले की, सौर उर्जा प्रकल्पासाठी आम्ही जी किंमत निविदेत दिली त्यापेक्षा एक डॉलर जास्त द्यावा लागत नाही इतकी प्रशासनात पारदर्शकता आहे. हे आपल्या सरकारने शिकण्यासारखे आहे. सौर ऊर्जेबाबत सरकारी धोरण निराशाजनक आहे. मनुष्यबळ, तंत्रज्ञान आणि क्षमता या तिन्हीबाबत आपल्याला ङ्गार मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. त्यासाठी आणखी प्रोत्साहन गरजेचे आहे.

डेक्कन वॉटर ट्रिटमेंटची मालकी सरकार या बंगाली उद्योजकाकडे असूनही तेथे ८० टक्के कर्मचारी मराठी आहेत आणि स्वतः अनिर्बन सरकार उत्तम मराठी बोलतात. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यात सेंट जोसेङ्गमध्ये झाले आहे तर अभियांत्रिकी पदवीपर्यंतचे शासकीय महाविद्यालयात झाले आहे.

Leave a Comment