‘टोपीवाले कावळे’ला चित्रपटगृहचालकांची टोपी

पुणे, – टोपीवाले कावळे या चित्रपटाच्या निर्मात्यांना चित्रपटगृह मालकांनी टोपी घातल्याचा आरोप निर्माते आनंत थोरात व शिवाजी दोलताडे यांनी केला आहे. हिंदी चित्रपटांमुळे मराठी गळचेपी होत असल्याचे प्रकार घडत असतानाच ‘टोपीवाले कावळे’ या मराठी चित्रपटाच्या निर्मात्याची वितरकाकडूनच फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, या मागे संपूर्ण वितरकांची साखळीच असल्याचा आरोप ‘टोपीवाले…’चे निर्मात्यांनी म्हटले आहे.

‘टोपीवाले कावळे’ हा चित्रपट सोलापुर येथील आशा चित्रपट गृहास अनुप जगदाळे या वितरका मार्फत गेला होता. चित्रपट गृहाचे भाडेही भरले. ठरल्याप्रमाणे हा चित्रपट 2 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. परंतु, बहुतांश ठिकाणी या चित्रपटाचे शो फक्त पैसे घेऊन परंतु विनातिकीट दाखवले जात होते. तर काही ठिकाणी ‘टोपीवाले कावळे’ या चित्रपटा ऐवजी हिंदी चित्रपटाचे शो दाखवले गेले. सोलापूरमधील केशव चित्रपटगृहात प्रत्यक्ष निर्माते थोरात यांनाही हाच अनुभव आला. या प्रकरणी वितरक कंपनीकडे जाब विचारला असता त्याच चित्रपटगृहात निर्मात्याला थिएटर मालकाकडून दमदाटी करण्यात आली. तसेच ‘टोपीवाले…’ चे शो सगळ्या चित्रपट गृहातून काढून टकतो असे धमकी वजा उत्तर मिळाले. पण चित्रपट गृहाच्या भाड्याच्या परताव्या बाबत हात वर करण्यात आले.

शोचे विनातिकीट सादरीकरण, मराठी चित्रपटाच्या जागी हिंदी चित्रपटांचे शो दाखविणे, चित्रपटाचे प्रमोशन न करणे ही सरळसरळ चित्रपट वितरकांनी मराठी चित्रपट निर्मात्याची केलेली फसवणून आहे. दरम्यान, या प्रकरणी थोरात यांनी सोलापूर चावडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तसेच चित्रपट महामंडळ सदस्य मेघराजराजे भोसले, मनसे व शिवसेना चित्रपट सेना यांच्याकडेही तक्रार केली आहे. तसेच सांस्कृतीक मंत्री संजय देवताळे यांच्याकडेही दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment