‘टाइम प्लीज!’ चित्रपटाने दहा दिवसांमध्ये केला 1 कोटी व्यवसाय

26 जुलै 2013 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या ‘टाइम प्लीज!’ लव्हस्टोरी… लग्नानंतरची या मराठी चित्रपटाला पहिल्या दहा दिवसांमध्ये प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने दहा दिवसांमध्ये 1 कोटी 23 लाख रुपयांचा गल्ला जमविला. केवळ 127 प्रतींनीच सुरुवात करुनही चित्रपटाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवसाय केला, अशी माहिती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे संजय छाब्रिया यांनी दिली. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वांस यांनी केले आहे. नव्याने लग्न झालेले जोडपे आपल्या नवीन आयुष्यातील लवचिक आणि आव्हानात्मक दिवसांना कसे सामोरे जाते आणि त्यावर कशी मात करते, याची कथा या चित्रपटात साकारली गेली आहे. कथा, पटकथा आणि संवाद क्षितीज पटवर्धन यांचे आहेत. हृषिकेश कामेरकर यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. यामध्ये उमेश कामत, प्रिया बापट, सई ताम्हणकर आणि सिध्दार्थ जाधव यांच्या भूमिका आहेत.

Leave a Comment