शाहरुख पडला फूटबॉलच्या प्रेमात

कोण कधी कशाच्या प्रेमात पडेल हे काही सांगता येत नाही. आता आपल्या किंग खान शाहरुखचे उदाहरण घ्या आता तो क्रिकेट सोडून फूटबॉलच्या प्रेमात पडला आहे. तसे पहिले तर आपला शाहरुख खान कोलकाता नाईट रायडर्सचा मालक आहे. पण गेल्या काही दिवसापासून त्याची आता फूटबॉल टीमच्या कोलकाता फ्रेंचाईसीची खरेदी करण्याची इच्छा आहे. आगामी काळात शाहरुखला अखिल भारतीय फूटबॉल महासंघ आणि आएमजी-रिलायंसची आयपीएल स्टाईल नव्या लीगची कोलकाता फ्रेंचाईसी हवी आहे.

आठ शहरांच्या फ्रेंचाईजीसाठी पुढील महिन्यात बोली लागेल तर ऑक्टोबर महिन्यात खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या खेळाडूंमध्ये भारतीयांबरोबर परदेशी खेळाडूही असणार आहेत. गोव्यातील आय लीग क्लब डेम्पोत शाहरुख भागिदारी विकत घेणार होता. मात्र आता नवी लीग येत आहे तर, तो कोलकाता फ्रेंचाईसी विकत घेण्याचा विचार करीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

आयपीएलच्या धर्तीवरील १८ जानेवारीपासून फूटबॉल लीग सुरू होणार आहे. नवी मुंबईतल्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर उद्‌घाटनाचा सामना होणार आहे. या लीगमध्ये मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता, कोची, गोवा, दिल्ली आणि बंगळूरु या आठ शहरांचे फ्रेंचाईस असतील तर गुवाहाटी आणि हैदराबाद या शहरांना राखीव ठेवण्यात आले आहे. त्यमुळे शाहरुख आता क्रिकेट सोडून फूटबॉलच्या प्रेमात पडला आहे.

Leave a Comment