रघुराम राजन आरबीआयचे नवे गव्हर्नर

नवी दिल्ली – सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार रघुराम राजन यांची रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सध्याचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांचा कार्यकाळ येत्या 4 सप्टेंबरला संपणार आहे. त्यांच्या जागी राजन यांची नेमणूक करण्यात आली आहे. पुढील तीन वर्षासाठी ते आरबीआयचा कार्यभार सांभाळतील.

राजन हे भारतीय लोकसेवा आयोगाचे अधिकारी नसलेले पहिलेचे गव्हर्नर असतील. केंद्रीय अर्थमंत्रालयानं या संबंधिची अधिसूचना जारी केली आहे. पी. चिदंबरम यांनी दुसर्‍यांदा अर्थमंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यावर रघुराम राजन सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार झाले. गव्हर्नरच्या पदासाठी माजी मुख्य अर्थ सचिव अरविंद याराम यांच्या सह अनेक ज्येष्ठ सनदी अधिकार्‍यांची नावं चर्चेत होती. पण सरकारनं रघुरामन राजन यांनाच प्राधान्य दिलं आहे.

राजन यांना आयएमएफ म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणे निधीतील कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. रुपया आणि डॉलरची सध्याची स्थिती आणि भारतातून बाहेर जाणारी गुंतवणूक याविषयी रिझर्व्ह बँकेची यापुढची पावलं महत्वाची ठरणार आहेत.