नवी दिल्ली – येत्या सप्टेंबरपासून राजधानी नवी दिल्लीत भारती एअरटेलतर्फे फोर जी सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. भारत ही फोर जी सेवेसाठी अतिशय आकर्षक आणि खूप संधी असलेली बाजारपेठ असल्याचे कंपनी अधिकार्यांचे म्हणणे आहे.

भारती एअरटेलने फोर जी नेटवर्क निर्मिती आणि ती चालविण्यासाठी चीनी डिव्हायसेस कंपनीची सेवा घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीने यापूर्वीच कोलकाता, बंगलोर, पुणे आणि चंदिगड येथे फोर जी सेवा सुरू केली आहे असेही कंपनी अधिकार्यांनी सांगितले.