विश्वविद्यालयात शिकविणार प्रेम विषय

कोलकाता दि.५ – कोलकाता प्रसिडेन्सी विश्वविद्यालयात यावर्षी पासून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रेम हा विषय निवडता येणार असून प्रेमासारख्या गूढ विषयाचा अंतर्भाव करणारे देशातले हे पहिले विश्वविद्यालय ठरले आहे.

प्रेसिडेन्सी विश्वविद्यालयाच्या कुलगुरू मालविका सरकार म्हणाल्या की येत्या जानेवारीपासून विज्ञान अथवा कला अशा कुठल्याही शाखेतील विद्यार्थी हा विषय घेऊ शकणार आहेत. सध्या त्याची सांगड सामाजिक शास्त्राशी घातली गेली असून त्या अंतर्गत प्रेमाचे सैद्धांतिक पैलू विद्यार्थ्यांना समजावून दिले जाणार आहेत.

फिजिक्स विभागाचे अध्यक्ष सोमक रायचौधुरी म्हणाले की भारतीय विद्यापीठात पारंपारिक शिक्षणानुसार ऑनर्ससाठी विद्यार्थ्यांना दोन अन्य विषय घेणे बंधनकारक आहे. विद्यार्थी हे विषय बंधनकारक असल्याने ते घेतात मात्र विद्यार्थ्यांवर असे विषय लादले जाऊ नयेत असा आमचा प्रयत्न आहे. त्याऐवजी विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना दोन आर्टसचे पेपर व कला विद्यार्थ्यांना दोन विज्ञानाचे पेपर घेता येतील अशी सोय केली जात आहे. प्रेम विषय शिकविणारे हे पहिलेच विद्यापीठ आहे.

Leave a Comment