विमानप्रवास करू इच्छिणार्‍यांसाठी आनंदवार्ता

नवी दिल्ली- विमानप्रवास करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असतं. परदेशात किंवा परराज्यात जायचं असेल तरीही बस, ट्रेन पेक्षा विमानाने जाता आले तर अधिक चांगले अशीच सर्वांची अपेक्षा असते. कमी वेळा दूरवरचे अंतर कापायचे असेल तर विमानप्रवासच कामी येतो. अशा परिस्थितीत विमान प्रवास करू इच्छिणार्‍या सर्वसामान्य लोकांसाठी आनंदाची बातमी आहे.

ज्यांनी आत्तापर्यंत कधीच विमान प्रवास केला नाही, त्यांच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे. अनेक एअरलाईन्सनी आपल्या विमानांची तिकीटं काही काळासाठी कमी केली आहेत. जेट एअरवेजने एक ऑफर सुरू केली आहे. 9 ऑगस्टपूर्वी तिकिट बुक करणार्‍यांसाठी कमी पैशांत विमान प्रवास मिळणार आहे. 750 किमीपेक्षा कमी अंतराचा प्रवास करणार्‍यांना 1,777 रुपयांमध्ये प्रवास करायला मिळणार आहे.

750 किमी ते 1000 किमी अंतर असल्यास 2,777 रुपये तिकिट असेल. 1000 किमीपेक्षा अधिक अंतरावरील प्रवासासाठी 3,777 रुपये तिकिट असेल. मात्र या तिकिटावर टॅक्स मात्र प्रवाशांनाच भरावा लागणार आहे. 10 ऑगस्टनंतर हे प्रवास सुरू होतील. विमानातील बहुतेक सुविधा या तिकिटात प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. सध्या मंदी असल्यामुळे जेट एअरवेजने ही सुविधा सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे.

Leave a Comment