रविंद्र जडेजा आयसीसी क्रमवारीत अव्वल

दुबई – भारताचा डावखूरा फिरकीपटू रविंद्र जडेजा याने गोलंदाजांसाठीच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अग्रस्थान मिळविल्याचे रविवारी जाहीर केले. अनिल कुंबळेनंतर हा मान मिळविणारा जडेजा हा चौथा भारतीय गोलंदाज आहे. कुंबळे याने गोलंदाजांच्या क्रमवारीत 1996 मध्ये पहिले स्थान मिळवले
होते.

झिंबाब्वे दौ-यात जडेजाने पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये पाच बळी घेतले. जडेजाने हा मान पहिल्यांदाच मिळवला असून वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज सुनील नरीन याच्याबरोबर जडेजाही आता संयुक्तपणे गोलंदाजाच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. यापूर्वी कपिल देव (मार्च 1989),
मनिंदर सिंग (डिसेंबर 1987 – नोव्हेंबर 1988) आणि अनिल कुंबळे (नोव्हेंबर-डिसेंबर 1996) यांनी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले आहे.

जडेजाबरोबरच भारताचा अन्य फिरकीपटू अमित मिश्रा यानेही या क्रमवारीत 47 व्या स्थानावरून 32 व्या स्थानावर झेप घेतली आहे. मिश्रा याने नुकत्याच झालेल्या झिंबाब्वे दौ-यात विक्रमी 18 बळी घेतले. दरम्यान. फलंदाजांच्या क्रमवारीत मात्र विराट कोहली आणि महेंद्रसिंग यांचे स्थान घसरले आहे. ते अनुक्रमे चौथ्या आणि सातव्या स्थानावर गेले आहेत. सुरेश रैना याने एक घर पार करत 17 वे तर शिखर धवनने 16ने आघाडी घेत 23ने स्थान पटकावले आहे.

Leave a Comment