महिलांनी चूल व मूल यावतून बाहेर पडावे: आर आर पाटील

पुणे, – चुल आणि मूल या परंपराहेगत बंधनातून मुक्त होवून हिरारीने वेगवेगळया क्षेत्रात पुरुष वर्चस्वाची मिजासदारी मोडीत काढत सध्याच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग हे प्रेरणादायी परिवर्तन असल्याचे मत गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी रविवारी व्यक्त केले. टिळक स्मारक मंदिरामध्ये पुण्यरत्न चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रणरागिणी पुरस्काराचे वितरण व शिवस्मृती अंकाचे प्रकाशन.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवस्मृतीचे संपादक सतीश जावडेकर, अ‍ॅड. म.वि. अकोलकर, खासदार वंदना चव्हाण, पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ आदी उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार राही भिडे , एव्हरेस्टवीरम प्रियांका मोहिते, सिने कॅमेरावुमन स्वप्ना पाटसकर, सामाजिक कार्यकर्त्याम डॉ. वैशाली कुलकर्णी, माधवी सागळे, ब्रीजबाला शहा यांना रणरागिणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पाटील म्हणाले, काळ खूप झपाट्याने बदलत असून पूर्वीसारखी बंधने आता महिलांवर राहिलेली नाहीत. अनिष्ठ प्रथा, विचारांचा अभाव, शिक्षणाची वंचितता हे महिलांच्या प्रगतीच्या आड येणारी कारणे आहेत. महिलांना दिलेल्या आरक्षणाच्या ताकदीमुळे त्यांना विविध क्षेत्रात मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाल्याने सर्वप्रकारच्या व्यवसायामध्ये महिलांनी पाऊल्ा टाकून ते भरभक्कमपणे रोवत समाजात आदर्श प्रस्थापित केला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन आपल्या क्षेत्रात नावलौकिक मिळविणाजयांना प्रोत्साहन देण्याने समाजातील चांगुलपणा टिकून राहतो, असे पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.आरती दातार यांनी केले.
—————–