कॉफीमुळे आत्महत्येच्या प्रवृत्तीत घट

न्यूर्यार्क – अधिक कॉफी पिणारे लोक कमी कॉफी पिणार्‍या लोकांपेक्षा कमी प्रमाणात आत्महत्येस प्रवृत्त होतात असे हार्वर्ड विद्यापीठातल्या संशोधकांच्या निरीक्षणांती आढळून आले आहे. हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेच्या संशोधकांनी अधिक कॉफी पिणारे आणि कमी कॉफी पिणारे लोक यांच्या मनःस्थितीचा १६ वर्षे अभ्यास केला. २ लाख लोकांच्या कॉफी पिण्याच्या सवयी आणि त्यांची मानसिक बैठक या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर ते अशा निष्कर्षाप्रत आले की, अधिक कॉफी पिणार्‍या लोकांमध्ये आत्महत्येची प्रवृती कमी असते.

२०११ साली याच प्रयोगामध्ये अधिक प्रकर्षाने निरीक्षणे नोंदविली गेली तेव्हा दररोज दोन पेक्षा अधिक कप कॉफी पिणार्‍या महिलांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण कमी कॉफी पिणार्‍यापेक्षा १५ टक्क्यांनी कमी असते असे दिसून आले. हे निष्कर्ष द वर्ल्ड जर्नल ऑफ बायोलॉजिकल सायकियाट्रीया नियतकालिकात प्रसिध्द करण्यात आले आहेत.

ही प्रवृत्ती कॉफी पिणार्‍यात कमी का असावी याचा शास्त्रीयदृष्ट्या मागोवा घेतला असता हा कॅफेनचा परिणाम असल्याचे आढळले. शरीरामध्ये असे काही घटक आहेत की ज्या घटकांमुळे व्यक्तीला लवकर नैराश्य येते. ज्यांच्या शरीरात हे घटक जास्त त्यांच्यात नैराश्य जास्त आणि त्यांच्यातच आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त. परंतु नैराश्यास आणि आत्महत्येस कारणीभूत ठरणारे हे घटक कॉफीतल्या कॅफेन या द्रव्यामुळे मर्यादित राहतात आणि नैराश्यावर मात केली जाते. म्हणून कॉफी जास्त पिणार्‍यांमध्ये नैराश्यही कमी असते आणि त्यांच्यात आत्महत्या करण्याची प्रवृत्तीही कमी असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment