अफवांचा मी विचार करत नाही : आलिया

:’स्टुडंट ऑफ द इअर’मधून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणारी आलिया तिच्या चित्रपटातील अभिनयापेक्षा तिच्या नवनवीन अफेअर्समुळे अधिक चर्चेत असते. याबाबत बोलताना ती म्हणते की, ‘मी सध्या बॉलिवूडमध्ये नवीन असले तरी अशा अफेअर्सच्या अफवांचा मी विचार करत नाही. अशा अफवांना कशा प्रकारे हाताळायचे हे मला चांगले माहीत आहे. मी कधीही या अफवांवर लक्ष देत नाही.’ आलियाचे नाव वरुण धवन आणि अर्जुन कपूर यांच्याबरोबर सध्या घेतले जात आहे.

याबाबत खुलासा करताना ती म्हणते की, ‘मला जेव्हा कधी कुणाविषयी प्रेम वाटेल तेव्हा त्या भावना मी कधीही लपविणार नाही.’ पुढे ती म्हणते की, ‘मी माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून अशा अफवा ऐकतेय. वरुणबरोबर माझे प्रेमसंबंधांच्या बातम्या तेव्हापासूनच येताहेत जेव्हा मी त्याला ओळखतही नव्हते. मी आता याविषयी प्रतिक्रिया देणे बंद केले आहे. कारण या अफवांमुळे मला काहीही फरक पडत नाही. माझ्या मते, अशा कथित कहाण्या म्हणजे चिंतेचा विषय नसतात ज्यात काहीही वास्तव नसते. मी जेव्हा असे नाते बनवेन तेव्हा मी त्या व्यक्तीशी कधी जोडले गेले आहे हे माझ्याकरिता जास्त महत्त्वाचे असेल. मग ती व्यक्ती कोणत्याही व्यवसायातील असो.’ ‘स्टुडंट ऑफ द इयर’नंतर आलिया करण जोहरचा चित्रपट ‘टू स्टरेट्स’मध्ये अर्जुन कपूरबरोबर दिसणार आहे. अर्जुनबद्दल बोलताना ती म्हणते की, ‘अर्जुन खूप चांगला सहकलाकार आहे. माझी हिंदी भाषा खूप कमजोर आहे. तो ती सुधारण्यास मला मदत करतो. मी त्याची मोठी प्रशंसक आहे आणि ‘इश्कजादे’मधील त्याचा अभिनय मला खूप आवडला.’

Leave a Comment