वॉशिग्टन दि.५ – छोट्या मुलांना स्मार्टफोन देणार्याय पालकांसाठी संशोधकांनी धोक्याचा इशारा दिला आहे. छोटी मुले दीर्घकाळ स्माटफोन हाताळत असतील तर त्यांच्या मेंदूचा होणारा विकास थांबू शकेल असा इशारा या संशोधकांनी दिला आहे. दोन ते तीन वयोगटातील मुलांना स्वतःचा स्मार्टफोन देणार्याळ पालकांची संख्या एकूण पालक संख्येच्या २५ टक्के इतकी आहे , त्या पार्श्वभूमीवर केल्या गेलेल्या संशोधनात या बाबी स्पष्ट झाल्या आहेत.
संशोधक शास्त्रज्ञ गेल साल्टझ या संदर्भात म्हणाले की दोन ते तीन वयोगटातील मुलाना स्मार्टफोन देणार्याे पालकांची संख्या वाढते आहे. स्माटफोन हे लहान मुलांना शिकण्यासाठीचे चांगले माध्यम आहे असा या पालकांचा समज आहे. मात्र स्मार्टफोनसारखी उपकरणे वापरण्यासाठी हे वय फारच कमी आहे. मुले त्यातून कांहीही शिकत नाहीत तर मनोरंजक खेळणे याच दृष्टीने ती त्याकडे पाहतात. वास्तविक दोन ते पाच वर्षे हे वय मेंदूच्या विकासाचे आहे. त्यावेळी मुलांना बोलणे, चालणे, इंटरअॅक्शन करणे यासारख्या अनेक बाबींचे प्रत्यक्ष शिक्षण दिले गेले पाहिजे.
या वयात स्मार्टफोन दिले गेले तर भविष्यात ते काळजीचे कारण ठरू शकते. कारण या वयापासून स्मार्टफोन हाताळणारया मुलांच्या मेंदूचा योग्य प्रकारे विकास होत नाही असे संशोधनातून दिसून आले असल्याचे गेल यांचे म्हणणे आहे.