राजस्थानात प्रामाणिक अधिकार्‍याचा बळी

जयपूर – उत्तर प्रदेशात दुर्गाशक्ती नागपाल या आयएएस महिला अधिकार्‍याच्या निलंबनाचा वाद जारी असतानाच राजस्थानातील कॉंग्रेस सरकारने अशाच एका प्रामाणिक आयपीएस अधिकार्‍याची आकसाने बदली केल्याचे प्रकरण समोर आले आहे. राजस्थानातील जैसेलमेर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पंकज चौधरी यांनी पोखरण येथील कॉंग्रेसचे आमदार सालेह महंमद यांचे वडील गाझी ङ्गकीर यांच्या गुन्हेगारी प्रकरणाचे उत्खनन सुरू करताच केवळ ४८ तासाच्या आत त्यांची किशनगढ येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे.

गाझी ङ्गकीर यांच्यावर तस्करीचे आणि मारामारीचे काही गुन्हे आहेत. १९६५ सालपासून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. मात्र राजकीय दबाव आणून त्यांची चौकशी टाळली जाते. १९८४ साली तर त्यांच्या ङ्गायलीच गायब करण्यात आल्या. १९९० साली पुन्हा चौकशी सुरू झाली, मात्र काही दिवसांनी ती चौकशी बंद करण्यात आली. २०११ साली एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने या ङ्गायली बंद करण्याचा आदेश दिला. मात्र पंकज चौधरी यांनी त्यांची पुन्हा चौकशी सुरू केली. २८ जुलै रोजी त्यांनी ङ्गायली चाळायला सुरुवात केली, परंतु ३१ जुलै रोजी त्यांची बदली करण्यात आली.

गाझी ङ्गकीर यांच्या गुन्हेगारीमुळे जैसेलमेर या पर्यटन क्षेत्रात दहशत निर्माण केलेली आहे. त्यामुळे जो अधिकारी त्यांची चौकशी करतो त्याचे स्थानिक व्यापार्‍यांमधून स्वागत केले जाते. आताही चौकशी सुरू झाल्यामुळे व्यापार्‍यांत आनंदाचे वातावरण पसरले होते, परंतु पंकज चौधरी यांची बदली झाल्यामुळे जैसेलमेर शहरात उत्स्ङ्गूर्तपणे बंद पाळण्यात आला. काही व्यापार्‍यांनी निदर्शने सुद्धा केली. प्रामाणिक अधिकार्‍याचा बळी दिला जात आहे असा आरोप या निदर्शकांनी केला.

दरम्यान, दुर्गाशक्ती नागपाल हिच्या निलंबनाच्या विरोधात कॉंग्रेसचे नेते बयानबाजी करत आहेत. त्यांना उत्तर देण्यासाठी कॉंग्रेसच्या राज्यातल्या या प्रामाणिक अधिकार्‍याच्या बदलीचे प्रकरण समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी पुढे आणले आहे. कॉंग्रेसची राज्य सरकारे सुद्धा प्रामाणिक अधिकार्‍याला आपले कर्तव्य बजावू देत नाहीत हे दाखविण्यासाठी हे प्रकरण सांगितले जात आहे. मात्र राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपल्या सरकारवरचा हा आरोप ङ्गेटाळला असून पंकज चौधरी यांची बदली हा नेहमीच्या बदल्यातलाच एक प्रकार असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment