रणबीरने उडविली शाहरुख-सलमानची टर

कॅटरिना सोबत प्रेमसंबंध जुळल्यापासून रॉकस्टार रणबीर कपूर आपल्याच धुंदीत आहे. एवढेच नव्हे, तर आता तो चित्रपटाच्यानिमित्ताने दबंग सलमान खानची टर उडवीत आहे. रणबीरच्या ‘बेशरम’चे ट्रेलर नुकतेच रिलीज झाले. हे ट्रेलर पाहून सलमानच नव्हे, तर शाहरुख चाहते देखील संतप्त झाले आहेत. ‘बेशरम’च्या ट्रेलरमध्ये रणबीरने सलमान आणि शाहरुख यांची टर उडविली आहे. ‘चुलबूल नाव ठेवून कुणी दबंग होत नाही’ असा संवाद या चित्रपटात आहे.

दुसरीकडे शाहरुखच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटातील ‘तुझे जेखा तो ये जाना सनम’ हे गाणे म्हणत तो मोहरीच्या शेतात लघुशंका करीत आहे. ‘बेशरम’चा दिग्दर्शक अभिनव कश्यपनेच या टीकेला उत्तर दिले आहे. तो म्हणाला, सलमानच्या ‘दबंग’चे दिग्दर्शन मीच केले होते. ‘चुलबूल’ हे एक नाव असून, ते मीच दिले आहे. मी स्वत:ची टर कशी उडवीन? . हा केवळ एक गैरसमज आहे. तर शाहरूखबद्दल तो भाग केवळ ट्रेलरमध्ये असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment