भारताच्या महिला हॉकी संघाला कांस्य पदक

मोंचेनग्लादबाक (जर्मनी) – भारताच्या ज्युनियर महिला संघाने हॉकी विश्वचषकात कांस्य पदक पटकावलं आहे. भारतानं पेनाल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडवर 3-2 असा विजय मिळवत पदकावर कब्जा केला. या स्पर्धेत भारताने तब्बल 33 वर्षांनी पदक जिंकलं आहे.

भारताने तेराव्या मिनिटाला गोल केला होता. मात्र सामन्याच्या निर्धारित वेळेत इंग्लंड आणि भारत 1-1 असे बरोबरीत होते. त्यामुळे सामन्याचा निकाल पेनाल्टी शूटआऊटद्वारे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताच्या राणी रामपालने 2 गोल करून भारताला विजय मिळवून दिला.

भारतीय हॉकीची सध्याची परिस्थिती पाहता, हा विजय नक्कीच आशादायी आहे. भारतात महिला हॉकीला त्यामुळे प्रोत्साहन मिळेल. दरम्यान, हॉकी इंडियाने या खेळाडूंना प्रत्येकी एक लाख रुपये देण्याचं जाहीर केलं आहे.

Leave a Comment