कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) -डॉन ब्रॅडमन यांच्या बॅटचा महिनाअखेर लिलाव विश्व विख्यात क्रिकेटपटू डोनॉल्ड ब्रॅडमन यांनी ज्या बॅटने धावांचा पाऊस पाडला, त्यातील एक बॅट या महिनाअखेर होणार्या लिलावात ठेवली जाणार आहे. या बॅटचे किमान मूल्य 20,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्स ठेवण्यात आले आहे.
ब्रॅडमन यांच्या बॅटचे किमान मूल्य 20,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्स
1948 मध्ये ब्रॅडमन यांनी या बॅटचा वापर केला होता. या बॅटवर विजेत्या संघातील खेळाडूंच्या स्वाक्षर्याही आहेत. डॉन ब्रॅडमन यांनी प्रथम श्रेणीतील शेवटच्या सामन्यात स्काईस बॅटचा उपयोग केला होता, अशी माहिती लिलावाचे संयोजक चार्ल्स लेस्की यांनी दिली. लिलावात ठेवल्या जाणार्या बॅटमधूनच ब्रॅडमन यांनी शेवटच्या सामन्यात 115 धावा काढल्या होत्या.
त्यावेळी म्हणजे 1948मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंड दौर्यावर होता. त्या काळी ब्रॅडमन यांच्या संघाने अॅशेस मालिका जिंकली होती. एकही सामना त्यांच्या संघाने गमावला नव्हता. त्या दौर्यातील डॉन ब्रॅडमन यांच्या किटमधील सर्व साहित्य 1984 पासून वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनने जतन करूनठेवले आहे. तीलच ही एक बॅट आहे.
येत्या 15 ऑगस्टला या बॅटचा लिलाव केला जाणार आहे. हा लिलाव मेलबर्नमध्ये होणार आहे. डॉन ब्रॅडमन यांची ही बॅट या लिलावातून सर्वाधिक रक्कम मिळवून देईल, अशी आशा लेस्की यांनी व्यक्त केली. सर ब्रॅडमन यांचे 2001 मध्ये वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. ब्रॅडमन यांनी शेवटचा सामना इंग्लंडमध्ये खेळला. त्या सामन्यात ते शून्यावर बाद झाले होते. तरीही त्यांच्या जीवनातील धावांची सरासरी 99.94 होती.