धोतर नेसलेल्या भारतीयाला दुबई मेट्रोत मनाई

दुबई- धोतर घालून मेट्रो रेल्वे स्थानकात गेलेल्या एका वयोवृध्द भारतीयाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखल्याचा प्रकार रविवारी दुबईत घडला. दुबईतील एतिसलात मेट्रो स्थानकावर मधुमती आणि तिचे वडिल (67) पोहोचले असता पंचिंग गेटजवळील सुरक्षा रक्षकाने त्यांना थांबवले.

वृध्दाने धोतर घातल्याने त्यांना मेट्रोतून प्रवास करण्याची परवानगी नाही असे कारण देत त्या सुरक्षा रक्षकाने दोघांनाही मेट्रो स्थानकात प्रवेश नाकारला.

मेट्रोतून प्रवास करण्यास दुबईत कोणत्याही प्रकारचा ड्रेस कोड नसल्याचे मधुमती यांनी सांगितले.याप्रकरणी त्यांनी दुबईतील मेट्रो रेल्वे प्रशासनाकडे तक्रार नोंदवली आहे.

Leave a Comment