नवी दिल्ली भ उत्तर प्रदेशातील गौतमबुद्धनगर येथील प्रांताधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांना निलंबीत केल्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी दुर्गाशक्ती यांना पाठिंबा दिला आहे. तसेच नागपाल यांच्यावर झालेल्या अन्यायावरुन राज्यात गुंडप्रवृत्ती वाढीस लागल्याचे स्पष्ट झाले आहे असे सांगत या गुंड प्रवृत्तीबाबत उत्तरप्रदेश सरकारला फटकारले आहे.
संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना मायावती म्हणल्या, की उत्तरप्रदेशातील जनतेसोबत आपल्या कार्यात इमानदार तसेच निष्ठावान असलेले कर्चाचारीही येथील वाईट व्यवस्थेचे बळी ठरत आहेत. दुर्गाशक्ती नागपाल यांना ज्या प्रकारे वाळू माफिया प्रकरणात अडकवण्यात आले आहे ती एक धक्कादायक बाब आहे. नागपाल यांचे लंबीत करणे म्हणजे हा त्यांच्यावर अन्याय आहे.
मायावतींनी उत्तरप्रदेशातील वाढत्या गुंडागिरीबाबत राज्य सरकारला चांगलेच फटकारले आहे. नागपाल यांच्यावर झालेल्या अन्यायावरुन राज्यात गुंड प्रवृत्ती वाढल्याचे स्पष्ट झाल्याचे मायावतींनी सांगितले आहे. दरम्यान, कादलपूर गावात बांधकाम सुरू असलेल्या प्रार्थनास्थळाची भिंत कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब न करता हटविल्याप्रकरणी शनिवारी (ता. 27) रात्री नागपाल यांचे निलंबन केले आहे. मात्र, दुर्गाशक्ती नागपाल यांनी परिसरातील वाळू माफियांविरोधात धडक मोहीम उघडली होती. त्यामुळे माफियाच्या दबावावरून नागपाल यांचे निलंबन करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.