
लेह/नवी दिल्ली – भारतीय हद्दीत गस्त घालणा-या भारतीय लष्कराला रोखून चिनी सैन्याने आपली मुजोरी कायम ठेवली. गेल्या आठवडयात उत्तर लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेपासून 14 किमी आत असलेल्या दोन चौकीदरम्यान तिरंगा’ मोहिमेंतर्गत गस्त घालणा-या भारतीय सैन्याला चिनी सैन्याने रोखले.