उत्तराखंडला माणसाचा धोका

नवी दिल्ली – उत्तराखंड हा प्रदेश पर्यावरणदृष्ट्या अतीशय संवेदनशील आहे, त्यातल्या त्यात केदारनाथ हे तीर्थक्षेत्र अधिक संवदेनशील आहे. त्याचे पर्यावरणीय स्वरूप टिकवायचे असेल तर या तीर्थक्षेत्राला माणसांपासून वाचवावे लागेल. या भागात वाढत चाललेली पर्यटक आणि भाविकांची गर्दी ही या भागासाठी अधिक धोकादायक आहे. तेव्हा ही गर्दी हटविण्याचा विचार करावा लागेल, असे स्पष्ट मत काही शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.

दिल्लीतील वाडिया इन्स्टिट्यूट ऑङ्ग हिमालयन जिऑलॉजी या संस्थेतील शास्त्रज्ञांनी उत्तराखंडातील नैसर्गिक आपत्तीनंतर केलेल्या पाहणीच्या अंती हा इशारा दिला आहे. केदारनाथ हे तीर्थक्षेत्र मंदाकिनी आणि सरस्वती या दोन नद्यांच्या प्रवाहाने वेढले गेलेले आहे. या दोन नद्यांचा संगम केदारनाथजवळ होतो मात्र या परिसरात पर्यटकांच्या सोयीसाठी कच्च्या पायावर घरे बांधण्यात आलेली आहेत. या बांधकामामुळे नद्यांच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाले असून त्यामुळेच हे नैसर्गिक संकट ओढवले आहे, असे डॉ. डी.पी. डोबाळ यांनी म्हटले आहे.

डॉ. डोबाळ हे हिमालयातील हिमखंडांचा अभ्यास करणारे तज्ज्ञ मानले जातात. २००७ साली अमेरिकेतल्या टाईम नियतकालिकेने डोबाळ यांचा हिरो ऑङ्ग हिमालयाज् म्हणून गौरव केला होता. डॉ. डोबाळ यांनी सुद्धा उत्तराखंडाच्या आपत्तीवर आपले मत व्यक्त केले आहे. या परिसरातल्या बांधकामांनी नद्यांचे प्रवाह अडवले गेले आणि त्यामुळे नद्यांचे त्या बांधकामांच्या मागचे पात्र दुथडी भरून वहायला लागले आणि त्या पात्रांच्या किनारी वसलेली गावे जलमय होऊन गेली, असे डोबाळ यांनी म्हटले आहे.

आता उत्तराखंडाच्या पुनर्वसनाचे आणि ङ्गेरबांधकामांचे प्रयत्न सुरू झाले आहेत, मात्र हे काम करताना नद्यांचे प्रवाह बांधकामामुळे अडवले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी असा सल्ला डॉ. डोबाळ यांनी दिला आहे.

Leave a Comment