वाशिंग्टन – अलकायदाच्या दहशतवादी हल्ल्यांना लक्षात घेऊन अमेरिकेने आज (सोमवार) आपल्या 19 राजदूत तसेच वाणिज्य दुतावासांना 10 ऑगस्टपर्यंत कामकाज बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ओबामा प्रशासनाने रविवारी एका दिवसासाठी 22 दुतावासांना तसेच वाणिज्य दुतावासांना बंद केले होते.
परराष्ट्र विभागाने मागील आठवड्यात जागतिक स्तरावरील दौर्या संदर्भात अलर्ट दिले होते. ज्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम आशियामधील अमेरिकेच्या नागरिकांना केंद्रबिंदू ठेवून हल्ला करण्याची शक्यता वर्तवली गेली होती. रमजान ईदच्या उत्सवामुळे तसेच ईद निमित्ताने स्थानिकांच्या परंपरांना लक्षात घेऊन परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते जेन साकी यांनी सतर्कतेच्या दृष्टीने आपल्या काही दुतावासांना तसेच वाणिज्य दुतावासांना आणखीन काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दुतावासांना बंद करण्याचा निर्णय हा सावधगिरी बाळगण्यासाठी घेण्यात आलेला असून स्थानिक कर्मचारी, वाणिज्य दुतावासांत आलेले नागरिक त्याचबरोबर आपल्या सर्वच कर्मचार्यांबद्दल सुरक्षेच्या दृष्टीने अमेरिका सरकारचे हे कर्तव्य असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहेत. जेन यांनी सांगितले, की अबूधाबी, अमान, कैरो, रियाद, देहरान, जेद्दा, दोहा, दुबई, कुवेत, मनामा, मस्कत, सना, त्रिपोली, अंतानारिवो, बुजुमबुरा, जीबूती, खारतूम, किगाली आणि पोर्ट लुई आदी ठिकाणी असलेल्या दुतावास – वाणिज्य दुतावासांना शनिवार 10 ऑगस्टपर्यंत सर्व काम बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.