नाट्य संमेलनासाठी नागपूर, सातारा व पंढरपूरची निमंत्रणे

पिंपरी, – अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी नागपूर, सातारा, पंढरपूर या तीन ठिकाणाहून निमंत्रणे आली आहेत. मात्र संमेलन कुठे घ्यायचे याबाबत ऑक्टोबर अथवा नोव्हेंबरमध्ये निर्णय घेतला जाणार आहे. अशी माहिती अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी रविवारी दिली.

नाट् परिषद आपल्या दारी योजना होती. त्याअंतर्गत मुंबई बाहेर. परिषदेच्या नियामक मंडळाची पहिली बैठक पिंपरी येथील टाटा मोटर्स डिव्हजन हॉस्टेल येथे पार पडली. त्यावेळी जोशी बोलत होते. यावेळी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष प्रमोद भुसारी, कोषाध्यक्ष लता नार्वेकर, मुख्य कार्यवाहक दिपक करंदीकर, सहकार्यवाहक भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते. नाट्यगृहाचे नूतनीकरण, नाट्यपरिषद पायाभूत सुविधा आणि शासन स्तरावर समन्वयक या त्रिसूत्रीवर नियामक मंडळ अधिक भर देणार असल्याचे सांगत जोशी म्हणाले, राज्यातील थिएटरची सद्या दुरावस्था आहे. ही थिएटर सुस्थितीत आणण्यासाठी शिवसेनेचे उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यासोबत याबाबत राज्यसरकारकडे पाठपुरावा केला आहे.

करंदीकर म्हणाले, नाट्य परिषदेच्या नियामक मंडऴाने जो मुंबई येथील यशवंत नाट्य संकुलाचे नुतणीकर, 573 रंगकर्मीचा आरोग्य विमा, तसेच शासकीय रूग्णालयात दोन ते पाच खाटा या रंगकर्मीसाठी राखीव ठेवाव्यात यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. राज्यभरातील विविध शाखेमध्ये स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला. या शाखेचे दोन स्तरावर मूल्यमापन केले जाणार आहे. त्यामध्ये आर्थिक आणि कार्य यांचा समावेश असेल. ेवर्षभरामध्ये मूल्यमापन केल्यानंतर तीन शाखांची निवड कऱण्यात येणार आहे. त्यामध्ये निवडण्यात येणार्‍या तीन शाखांना अनुक्रमे 51 हजार, 35 हजार आाणि 25 हजार रूपयांचे बक्षीस देण्यात येणार आहेत.

Leave a Comment