उजनी धरणात 84 टक्के पाणीसाठा

सोलापूर – राज्यातील तीन मोट्या म्हणजेच पुणे, अहमदनगर आणि सोलापूरया जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणार्‍या उजनी धरणात तब्बल 84 टक्के पाणीसाठा झाला आहे. पुणे जिह्यातील दौंड येथून जवळपास 67 हजार क्युसेक पाणी उजनी धरणात येत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

उजनी धरणात 7 जुनला वजा 50 टक्के इतका पाणी साठा होता. मात्र पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने उजनी धरण केवळ 60 दिवसांत 133.75 टक्के भरल आहे. उजनी धरणाची एकूण साठवण क्षमता 117.24 टीमसी असून त्यापैकी 53.58 टीमसी इतका उपयुक्त साठा आहे. तर 66.67 टीमसी अचल साठा आहे.

या उजनी धरणात सध्या पाणी पातळी 496 मीटर असून एकूण पाणीसाठा 3073.50 द.ल.घ.मी. असून 108.52 टीमसी पाणी उजनी धरणात सद्यस्थितीला असून धरण 83.75 टक्के भरले आहे. साधारणता उजनी धरण दोन दिवसात 100 टक्के भरेल. अस असल तरी उजनी धरणातून
2800 क्युसेक विसर्ग कालव्यात सोडला असून बोगद्यातून 950 क्युसेक विसर्ग सुरु आहे.

एकंदरीत गेली दोन वर्ष तळ गाठलेल उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल आहे. जरी सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी पुणे जिल्ह्यातील पावासाच्या कृपेमुळे हे धरण भरल्याने बळीराजासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल.