आयुष्यमान बनला असिस्टंट डायरेक्टर

“विकी डोनर” या चित्रपटातून बॉलीवूड सृष्टीत पदार्पण करणारा आयुष्यमान खुराणा आता असिस्टंट डायरेक्टर बनला आहे. जॉन एब्राहमचा आगामी चित्रपट “मद्रास कॅफे”साठी त्याने डायरेक्टर शुजीत सरकार यांच्यासह असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. २३ ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आयुष्यमान हा एक चांगला कलाकर तर आहेच; पण अभिनयाशिवाय अनेक सुप्त गुण त्याच्यात आहेत. आपल्यातील गीतकार आणि गायकाची ओळख त्याने पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांना करून दिली. त्याने स्वतः लिहिलेल्या आणि गायलेल्या “विकी डोनर” या चित्रपटातील पाणी दा रंग देख के … या गाण्याने सगळ्यांचीच मने जिंकली. आता आयुष्यमान दिग्दर्शक म्हणून ही स्वतःची ओळख निर्माण करू पाहतोय. डायरेक्टर शुजीत सरकारने डायरेक्टर केलेल्या “मद्रास कॅफे” या चित्रपटात जॉन एब्राहमसह सिद्धार्थ बासूही दिसणार आहे. यासाठी आयुष्यमानने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे.

या संपूर्ण चित्रपटाच शुटींग कोची मध्ये झाल आहे. एकूण ४० दिवसाचं हे शेड्युल होत. आयुष्यमान यातील १० दिवस कोची मध्ये प्रत्यक्षात सेट वर हजर होता. आपल्या अनुभवाबद्दल बोलताना आयुष्यमान म्हणाला, खरतर मला ४० दिवस काम करण्याची इच्छा होती. शुजीत सरकार यांच्यासह काम करताना खुप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. तर डायरेक्टर शुजीत सरकारनेही आयुष्यमानच्या कामाचे आणि मेहनतीचे कौतुक केले आहे.

Leave a Comment