दिल्ली रेल्वे स्टेशनवर 800 किलो चांदी जप्त

नवी दिल्ली – नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून दिल्ली पोलिसांनी 800 किलो चांदी जप्त केली आहे.

मुंबईहून दिल्लीला येणा-या राजधानी एक्सप्रेसमधून अवैधरित्या चांदी आणली जात असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. एकूण 17 बंडल पार्सल मधून ही चांदी छुप्या पद्धतीने नेली जात होती. बाजार पेठेत याची किंमत करोडोंच्या घरात आहे.

Leave a Comment