येशूच्या क्रॉसचा तुकडा सापडल्याचा दावा

वॉशिग्टन दि.३ – गुलगुन कोरोग्लू या तुर्की पुरातत्त्व तज्ञ महिलेने अति प्राचीन चर्चच्या उत्खननात एक दगडी तिजोरी सापडली असून त्यात येशूला ज्या क्रूसावर चढविले गेले त्या क्रूसाचा हिस्सा असू शकेल अशी एक वस्तू सापडल्याचा दावा केला आहे. काळ्या समुद्राजवळ असलेल्या सिनोप प्रांतातील बेलेटर चर्चजवळ हे उत्खनन केले गेले आहे.

कोरोग्लू या मिमार सिनान विद्यापीठात कार्यरत आहेत. त्यांच्या टीमने या अतिप्राचीन चर्चच्या कांही भागात उत्खनन केले आहे. त्या म्हणाल्या की उत्खननात आम्हाला एक दगडी पेटी मिळाली असून त्यावर क्रॉस कोरले गेले आहेत. या पेटीत एक अतिशय पवित्र वस्तू आढळली असून येशूला ज्या सुळावर चढविले गेले त्याचाच हा एक भाग आहे. आम्ही आत्तापर्यंत जेवढी उत्खनने केली त्यात सापडलेल्या अनेक वस्तूंत ही वस्तू ऐतिहासिक महत्त्वाची ठरण्याची दाट शक्यता आहे. पुढील तपासणीसाठी ही वस्तू प्रयोगशाळेत पाठविली गेली असल्याचे समजते.

Leave a Comment