मोदींचे उर्दूतही ट्विटर अकौंट

नवी दिल्ली दि.३ – राष्ट्रीय स्तरावर सर्व जनतेच्या संपर्कात राहण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय निवडणूक प्रचार प्रमुख नरेंद्र मोदी यांचे उर्दू सह बहुतेक प्रादेशिक भाषांत ट्विटर अकौंट उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे समजते. उर्दूसह मराठी, हिदी, तमीळ, मल्याळी, बंगाली, ओडिया, कानडी या प्रादेशिक भाषांतून हे अकौंट सुरू करण्यात आले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशातील अधिकाधिक जनतेपर्यंत मोदींचे नांव पोहोचावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. उत्तर प्रदेशात उर्दू भाषिकांची संख्या अधिक असल्याने उर्दू ट्विटर सुरू केले गेले आहे आणि अल्पावधीत त्याला १७२ फॉलोअर मिळाले आहेत. मराठीत मोदींचे आत्तापर्यंत ४२० फॉलोअर नोंदले गेले आहेत.

भाजप संफ सेलचे सदस्य या संदर्भात म्हणाले की सोशल मिडियाचा प्रभावी वापर ही आता मोदींची ओळख बनली आहे आणि या माध्यामातून ते भारताच्या कानाकोपर्‍यातील नागरिकांपर्यंत पोहोचू शकतात. यामुळे ही अकौंट गरजेची होती.

Leave a Comment