दारूवाल्याना खुर्च्या व पानवाल्याना मिर्च्या – पानवाल्या’चा पुण्यात मोर्चा

पुणे. : महाराष्ट्रातील पानशॉपवाले सध्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. त्यांचे म्हणणे असे की, राज्यात दारू पासून सर्व प्रकारची व्यसनांची साधने येथे कायदेशीररीतीने मिळतात. ˆ पुण्यात बहुतेक उपनगरातून वेव पार्ट्यांचे फॅॅ ड सुरु असूनही त्यांच्यावर कारवाई केल्यासारखे दाखवले जाते पण दुसर्‍या बाजूला पानमसाला विकला म्हणून पोलीस पानवाल्या टपरीवर कडक कारवाई करतात, या त्रासाला कंटाळून पुण्यातील तीनशे पानवाल्यांनी आज पुण्यात मोर्चा काढला. त्यांच्या हातातील फलक अतिशय बोलके होते.

दारूचा स्वैर वापर होवूनही व त्याचा समाजाला उध्वस्त होणारा परिणाम होवूनही दारूवर बंदी नाही. डान्सबार परत उघडण्यापासून सरकार रोखू शकलेले नाही. हुक्का पार्लर, मसाज पार्लर यावर बंदी नाही. पण पानमसाल्यावर मात्र बंदी आहे येवढेच नव्हे तर पानवाल्यांना देशद्रोही असल्याची वागणूक दिली जाते. यामुळे पुण्यातील पानवाले रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या न्यायमागण्यासाठी त्याना झगडावे लागणार आहे.