मुंबई – वक्फ बोर्डातील कोट्यवधी रुपयांच्या जमीन घोटाळ्याच्या मुद्दयावर आक्रमक झालेल्या भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी आज विधानसभेत अल्पसंख्याक मंत्री नसीम खान यांची चांगलीच कोंडी केली.
अंबानींच्या एन्टालिया इमारतप्रकरणात मंत्री व अधिकार्यांचे हितसंबंध
काँग्रेसच्या नेत्यांनी अल्लाच्या जमिनी लाटल्या असून उदयोगपती मुकेश अंबानी यांच्या एन्टालिया इमारतप्रकरणात संबंधित खात्याचे मंत्री व अधिका-यांचे तसंबंध असल्याचा आरोप करत या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी. अशी मागणी फडणवीस व मलिक यांनी केली. मात्र मंत्री नसीम खान यांनी हे आरोप फेटाळून लावत कायदेशीर आणि तांत्रिक मुद्दयांचा आधार घेत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
यासंदर्भात देवेंद्र फडणवीस, नवाब मलिक यांच्यासह अनेक आमदारांनी लक्षवेधी मांडली होती. वक्फ बोर्डातील कोटयवधी रुपयांच्या जमीन घोटाळ्याची सीबीआय कशी करण्याबाबत केंद्र सरकारने आदेश दिले आहेत. मात्र काँग्रेसच्याच नेत्यांनी अल्लाच्या जमिनी लाटल्याने सरकार सीबीआय चौकशीस टाळटाळ करत असल्याचा घणाघाती आरोप फडणवीस यांनी केला.
वक्फ बोर्डात चाललेल्या घोटाळ्यांना सरकारकडूनच संरक्षण दिले जात असून केंद्र सरकार तसेच सीव्हीसीने याबाबत दिलेल्या आदेशांवर मागील चार वर्षापासून कोणतीही कारवाई झालेली नाही. सरकारमध्ये बसलेलेच काहीजण संबंधितांना पाठिशी घालत आहेत. एन्टालिया प्रकरणात संबंधित खात्याचे मंत्री व अधिका-यांचे हितसंबंध गुंतले आहेत. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचीही दिशाभूल करण्यात आल्याचा थेट आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अल्पसंख्याक खात्याचे मंत्री नसीम खान यांच्यावरच जोरदार हल्ला चढविला.
वक्फ घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी. अशी आग्रही मागणी मलिक व फडणवीस यांनी यावेळी केली. मात्र, मंत्री नसीम खान यांनी हे आरोप फेटाळून वत कायदेशीर आणि तांत्रिक मुद्दयांचा आधार घेत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. वक्फ बोर्डातील घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या शेख आयोगाने लेला चौकशी अहवाल मंत्रालयाला लागलेल्या आगीत जळला. त्यामुळे या अहवालावर कार्यवाही करण्यास उशीर होत आहे.
चौकशी आयोगाचे अध्यक्ष ए.टी.एस शेख यांच्या डिस्कमधून डाटा पुन्हा मिळविण्यात आला असून एटीआर तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. यात कोणालाही पाठिशी घालणार नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू. असे नसीम खान यांनी सांगितले. मात्र याबाबत मंत्री नसीम खान यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी याबाबतची लक्षवेधी अखेर राखून ठेवली.
