नवी दिल्ली दि.२ – गृहमंत्रीपद स्वीकारून १ वर्ष पूर्ण झाले आहे आणि मी उत्तम टीम लिडर ठरलो आहे असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ७२ वर्षीय सुशीलकुमार यांच्यावर ३१ जुलै रोजी पी. चिदबरम यांच्याकडे असलेला गृहमंत्रीपदाचा भार सोपविला गेला होता.
सुशीलकुमार यांच्याकडे पूर्वी उर्जा खाते होते आता गृहखाते आहे, तेव्हा तुम्ही काय अचिव्ह केले असे विचारले असता सुशीलकुमार म्हणाले की माझ्यावर सातत्याने टीका केली गेली मात्र मी ती सहन करतो आहे. गृहमंत्रीपद हे आव्हानात्मक आहे. मी लहान माणूस आहे आणि देशाची सेवा करतो आहे. ही सेवा करायला मिळते आहे हीच माझी अचिव्हमेंट आहे. अनेकदा दुसर्यां चे दोषही मी माझ्या खांद्यावर घेतले आहेत आणि झालेली टीकाही सहन केली आहे. मात्र हे करणे आवश्यक आहे कारण त्यामुळेच डिपार्टमेंट मध्ये नेतृत्व असल्याचे जाणवत असते.