मुशर्रफ यांच्या फार्म हाउसवर हल्ल्याचा कट

इस्लामाबाद- पाकिस्तानमधील वायव्य भागातील एका तुरुंगावर यशस्वी हल्ला केल्यानंतर आता तालिबानी दहशतवाद्यांनी माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ
यांच्या फार्म हाउसवर हल्ला करण्याचा कट आखला आहे.

पाकिस्तानमधील न्यायालयात मुशर्रफ यांच्यावर अनेक खटले सुरु आहेत. या संदर्भात मुशर्रफ यांना त्यांच्या चाक शहजाद या फार्म हाउसवर स्थानबद्ध करण्यात आले आहे. या फार्म हाऊसला 20 एप्रिल रोजी तुरुंगाचा दर्जा देण्यात आला होता.

गुप्तचर यंत्रणेने दिल्ल्या माहितीनुसार तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ आणि सिपाह-ए-सहाबा पाकिस्तान’ या दहशतवादी संघटनांकडून मुशर्रफ यांच्या फार्म हाउसवर हल्ला होण्याची शक्यता आहे.

इस्लामाबादमधील लाल मशिद येथे 2007 साली पाकिस्तान लष्कराने केलेल्या कारवाईनंतर तालिबानच्या हिट लिस्टवर मुशर्रफ आहेत. तसेच 1999 ते 2008 या कार्यकाळात त्यांनी अमेरिकेच्या दहशतवादाविरुद्ध युद्धाला पाठिंबा दिला होता.

पाकिस्तानमधील वायव्य भागातील तुरुंगावर मंगळवारी तालिबानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 14 जण ठार झाले होते. तर तुरुंगातील तब्बल 250 दहशतवादी पळून गेले होते.

Leave a Comment