बिग बॉसच्या घरात जाणार अमीषा

रितिक रोशन सोबत ‘कहो ने प्यार है’ या सिनेमात बॉलीवुडमध्ये एंट्री करणारी अभिनेत्री अमीषा पटेल रियल्टी शो ‘बिग बॉस’ च्या घरात राहण्याची शक्यता आहे. सुत्रांने दिलेल्या माहितीनुसार अमीषाने बिग बॉसच्या घरात एक आठवडा राहण्यासाठी ७५ लाख रुपये मागितले आहेत.

तसे पाहिले तर गेल्या काही दिवसांपासून अमीषाकडे जास्त काम नाही. त्यामुळे अमिषाच्या डेट बाबात कुठलीच समस्या नाही. तरी पण तिची अजून चैनल सोबतची डील फायनल झाली नाही. अमिषाची डील फायनल झाली तर बिग बॉसच्या घरात तिला वाइल्ड कार्डमधून एंट्री दिली जाणार आहे. बिग बॉसचे घर सेलिब्रिटीच्या वादामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहे.

सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार अमीषाने चैनलला विश्वास दाखविला आहे की ती जर या शो मध्ये सहभागी झाली तर बिग बॉसच्या घरात नवे वाद उत्पन्न होतील. यापूर्वी, अमीषाचा भाउ अश्मित पटेल बिग बॉसमध्ये सहभागी झाला होता. त्याच्या पाकिस्तानी एक्ट्रेस वीना मलिक आणि टीवी एक्ट्रेस सारा खान सोबतच्या लव स्टोरीने पब्लिसिटी मिळवली होती. अमीषा सोबतच तिकडे चैनलने ममता कुलकर्णी सोबतपण संपर्क केला आहे.

Leave a Comment