दुबई जमीन व्यवहारात भारतीयांची सर्वाधिक गुंतवणूक

दुबई दि.१- दुबईच्या जमीन जायदाद बाजारात भारत सर्वात मोठा गुंतवणूकदार देश म्हणून पुढे आला आहे.२०१३ सालच्या पहिल्या सहामाहीतच भारतीयांनी दुबईत १३२.६ अब्ज रूपयांचे सौदे केले असल्याचे दुबई भूमी विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या अहवालानुसार दुबईतील रियल इस्टेट बाजारात भारतीय चलनाच्या हिशोबात जगभरातून ८७७.५ अब्जांची गुंतवणूक झाली आहे .पैकी भारतीय गुंतवणूक दारांचा वाटा १३२ अब्जांवर आहे. गेल्या संपूर्ण वर्षात ही गुंतवणूक १४९ अब्ज रूपये होती. त्यात यावर्षी पहिल्या सहामाहीतच लक्षणीय वाढ दिसून येत आहे.

अमेरिकन भूमि विभागातील निर्देशकांच्या मते दुबईतील रियल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणूक नेहमीच फायदेशीर ठरली आहे.

Leave a Comment