‘टोपीवाले कावळे’ उद्यापासून

कार्तिक फिल्मस् निर्मित अन् शिवाजी दोलताडे दिग्दर्शित ‘टोपीवाले कावळे’ हा चित्रपट 2 आँगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. सामाजिक अन् राजकीय पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाला विनोदाची झालर आहे.वेगवेगळ्या विषयात कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या समाजात वेगवेगळी प्रशिक्षण केंद्रे आहेत. पण पुढारी घडवण्यासाठी प्रशिक्षण केंद्र नाही. जर ते असेल तर याच बाबीवर भाष्य करणारा हा चित्रपट असून प्रसिद्ध कादंबरी टोपीवाले कावळे ’ वर आधारित आहे.

प्रसिद्ध विनोदी कलाकार सतीश तारे यांचा हा शेवटा चित्रपट असून राजेश श्रृंगारपुरे मुख्यमंत्र्याची भूमिका साकारतोय. याशिवाय नागेश भोसले, कमलाकर सातपुते, प्रकाश धोत्रे, सुनील गोडबोले, शिवाजी दोलताडे, मोहिनी कुलकर्णी यांच्या भुमिका आहेत. . तसेच तेजा देवकर व नितल शितोळे
यांचे बहारदार नृत्य या चित्रपटात आहे. पटकथा संजय कळमकर यांची तर संगीत – पुनीत दिक्षित व मोनू अजमेरी यांचे आहे.

Leave a Comment