
मँचेस्टर – अशेस मालिकेतील सुरूवातीच्या दोन सामन्यांमध्ये सपाटून मारा खावा लागल्याने आव्हान जीवंत ठेवण्यासाठी आजपासून सुरू होणारा सामना जिंकावाच लागणार आहे. त्यामुळे आगामी काळ हा टीम ऑस्ट्रेलियाची सत्वपरीक्षा पाहणारा ठरणार आहे.
मँचेस्टर – अशेस मालिकेतील सुरूवातीच्या दोन सामन्यांमध्ये सपाटून मारा खावा लागल्याने आव्हान जीवंत ठेवण्यासाठी आजपासून सुरू होणारा सामना जिंकावाच लागणार आहे. त्यामुळे आगामी काळ हा टीम ऑस्ट्रेलियाची सत्वपरीक्षा पाहणारा ठरणार आहे.
क्लार्क आणि कंपनी अशेस मालिकेतील तिस-या मँचेस्टर कसोटीला सामोरे जात आहेत. दुसरीकडे प्रतिस्पर्धी इंग्लंड संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. दडपणाखाली असलेला ऑस्ट्रेलियन संघासाठी मॅचेस्टर कसोटी ख-या अर्थाने आव्हानात्मक ठरेल. हे आव्हान त्यांना पेलवते की नाही हे मालिकेतील तिस-या कसोटीतून स्पष्ट होईल.
लॉर्डस कसोटीत तर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा फज्जा पाडला होता. यजमान इंग्लंडने ऐटीत ३४७ धावांनी विजय मिळवला होता. एकूणच क्लार्क आणि कंपनीसाठी ही लढत ‘ करो या मरो ‘ अशा धाटणीची आहे. ही कसोटी जिंकून मालिकेतील आव्हान कायम राखण्याचे मोठे काम त्यांना पार पाडायचे आहे. ऑस्ट्रेलियाने अपयश पुसून काढण्याच्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे, असे वाटते. म्हणूनच त्यांनी सध्या आपला शिस्तीचा कडक बाणा मागे घेत डेव्हिड वॉर्नरला ऑस्ट्रेलियन संघात स्थान दिले आहे.
इंग्लंडच्या जो रूटला मारहाण केल्याप्रकरणी वॉर्नरला शिक्षा म्हणून अशेस मालिकेतील पहिल्या दोन कसोटींमध्ये खेळवण्यात आले नव्हते. त्याऐवजी २६ वर्षांच्या वॉर्नरला ऑस्ट्रेलिया ‘ अ ‘ संघासह दक्षिण आफ्रिकेच्या ‘ अ ‘ संघाविरुद्ध खेळण्यासाठी पाठवण्यात आले होते. वॉर्नरने १९३ धावा करत फॉर्मात असल्याची पोचपावती दिली खरी , पण याच सामन्यात त्याने प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना चिथावणी खोर वक्तव्य केलीच. एकूणच शिक्षा भोगूनही वॉर्नरच्या स्वभावात काडीमात्र फरक पडलेला नाही.