श्रीनिवासन पुन्हा बीसीसीआयचे अध्यक्ष

नवी दिल्ली – एन.श्रीनिवासन यांनी पुन्हा एकदा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्र आपल्या हातात घेतली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार श्रीनिवासन यांनी मंगळवारी संध्याकाळीच पदग्रहण केलं.

आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बीसीसीआने दोन सदस्यांच्या समितीची स्थापना केली होती. त्याचा अहवाल मंगळवारीच प्राप्त झाल्यानंतर एन.श्रीनिवासन यांनी पुन्हा अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने स्पॉट फिक्सिंग नप्रकरणातील चौकशी समितीसंदर्भात बीसीसीआयला फटकारलं होतं. तसंच पुन्हा चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. पण त्यानंतरही न्यायालयाचा आदेश न जुमानता श्रीनिवासन यांनी पुन्हा एकदा अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्याचं कळतं.

बिहार क्रिकेट संघाचे सचिव आदित्य वर्मा यांनी बीसीसीआयच्या चौकशी समितीच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केला होता. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यपन यांची चौकशी करण्यासाठी ते स्वत: समितीची कशी काय स्थापना करु शकतात, असा सवाल याचिकेत करण्यात आला होता.

Leave a Comment