विधानसभेत आज सिंचन घोटाळ्यावर चर्चा शक्य

मुंबई: विधानसभेत राज्यरभरात गाजलेल्या सिंचन घोटाळ्यावर चर्चा व्हावी असा सूर गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी लावून धरला आहे. विरोधकांनी गदारोळ घातल्यानंतर सरकारतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्यावर चर्चा करण्यारचे आश्वासन दिले होते. सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार विधानसभेत बुधवारी या सिंचन घोटाळ्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात गाजलेला हा सिंचन घोटाळ्याचा मुद्दा कोर्टात असल्याचे सांगत सत्ताधा-यांनी त्यावर चर्चा करण्याचे टाळले होते. मात्र, त्यानंतर आता विरोधक अधिक आक्रमक झाल्याने सरकारने त्यांच्या मागणी मंजूर करत चर्चेचे आश्वासन दिले आहे. त्या मुळे या विषयावर बुधवारी चर्चा होण्याची शक्येता आहे.

त्याचबरोबर बुधवारी शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते, ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि मनसेचे आमदारांचे निलंबन मागे घेण्याचीही घोषणा केली जाऊ शकते. सरकार विरोधी पक्षांच्याच आमदारांचं निलंबन वारंवार का करतं असा प्रश्न विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसेंनी विधानसभेत केला होता. त्यामुळे बुधवारी विधानसभेत आमदारांचे निलंबन मागे घेण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Leave a Comment