मुंबईतील खड़डयामुळे शेवाळे यांचा राजीनामा स्टंट

मुंबई- काही दिवसांपासून मुंबईतल्या खड्ड्यांचा प्रश्न गाजत आहे. त्या मुळे मुंबई स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी राजीनाम्याचा स्टंट केला. खड्ड्यांची जबाबदारी स्वीकारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे धाडून दिला. अर्थात अपेक्षप्रमाणे उद्धव ठाकरेंनी हा राजीनामा फेटाळला आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा म्हणजे केवळ स्टंटच ठरला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सततच्या् पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यामुळे मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याबद्दलच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिलगिरी व्यक्त केली. खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून जाताना मुंबईकरांचा प्रचंड संताप होतो.

या सर्व प्रकाराचे खापर मुंबई महापालिकेवर फुटत असल्यायने म्हणूनच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्वतः या समस्येची पाहणी करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले. त्याममुळे खड्ड्यांची जबाबदारी स्वीकारत राहूल शेवाळेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा धाडून दिला. अर्थात अपेक्षप्रमाणे उद्धव ठाकरेंनी हा राजीनामा फेटाळला आहे.

Leave a Comment